मुंबई

‘एल्फिन्स्टन’साठी मेगाब्लॉकची मालिका

CD

‘एल्फिन्स्टन’साठी मेगाब्लॉकची मालिका
२६ तासांचे सहा मेगाब्लॉक; अंतिम सहा तासांत मुख्य गर्डर हटवणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : एल्फिन्स्टन रोड येथील जुन्या रेल्वेपुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेने पुढील महत्त्वाचा टप्पा निश्चित केला असून, १३२ मीटर लांबीचा मुख्य गर्डर आणि पॅनल हटवण्यासाठी एकूण २६ तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा मेगाब्लॉकपैकी पहिला चार तासांचा ब्लॉक सोमवारी (ता. ३०) मध्यरात्री घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान पुलावरील भलेमोठे पॅनल सुरक्षितरीत्या हटविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.


परळ-करी रोड स्थानकादरम्यान सोमवारी रात्री (ता. ३०) रात्री ११.४० ते मंगळवारी (ता. ३१) पहाटे ३.४० या वेळेत चार तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत एल्फिन्स्टन रेल्वे उड्डाणपुलावरील सुमारे ४० मेट्रिक टन वजनाचा पहिला पॅनल सुरक्षितरीत्या हटवण्यात येईल. मध्य रेल्वेकडून २६ तासांच्या कामासाठी एकूण सहा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यापैकी पाच ब्लॉक प्रत्येकी चार तासांचे असतील, या पाच ब्लॉकदरम्यान पुलावरील पाच जड पॅनल टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहेत. त्यानंतर मुख्य गर्डर हटवण्यासाठी सहा तासांचा अंतिम विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार पुलावर एकूण पाच जड पॅनल असून, प्रत्येकाचे वजन सुमारे ४० मेट्रिक टन आहे. ओव्हरहेड वायर (ओएचई) आणि रेल्वे मार्गिकांची तांत्रिक गुंतागुंत लक्षात घेता एकावेळी संपूर्ण संरचना हटवणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. प्रत्येक ब्लॉकदरम्यान प्रथम गर्डरला आधार देण्यासाठी विशेष सपोर्ट बीम बसवले जातील. त्यानंतर ८०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या सहाय्याने संबंधित पॅनल सुरक्षितपणे खाली उतरवले जाईल. या प्रक्रियेदरम्यान ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करून काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जोडणी करण्यात येणार आहे.

गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न
पाच ब्लॉकमध्ये सर्व पॅनल हटवल्यानंतर अंतिम सहा तासांच्या ब्लॉकमध्ये मुख्य लोखंडी गर्डर आणि बीम पूर्णपणे हटवले जाणार आहेत. या काळात दादर ते सीएसएमटीदरम्यान काही काळासाठी सर्व रेल्वे मार्गिका बंद ठेवाव्या लागू शकतात. बहुतांश ब्लॉक रात्रीच्या वेळेत घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांची गैरसोय कमी ठेवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

सुरक्षेवर विशेष भर
या कामादरम्यान रेल्वेच्या अभियांत्रिकी, विद्युत आणि देखभाल विभागांची संयुक्त पथके तैनात राहणार आहेत. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी नवे नियोजन शक्य होणार असून, प्रवासी सुविधांमध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT