मुंबई

मुंबईसह उपनगरांत पावसाचा अंदाज

CD

मुंबईसह उपनगरांत पावसाचा अंदाज
पुढील दोन दिवसांसाठी प्रशासनाकडून ‘अलर्ट’ जारी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : मुंबईकरांना आता उन्हाच्या चटक्यासोबतच पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार, ३१ मार्च ते २ एप्रिल या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.

कुलाबा वेधशाळेने सोमवारी (ता. ३०) सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २ एप्रिल रोजी देखील मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर ​ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ३० मार्च ते २ एप्रिल या चारही दिवसांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
​रायगड जिल्ह्यात परिस्थिती अधिक गंभीर असू शकते, येथे ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाढता धोका लक्षात घेता, मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने ३१ मार्च रोजी विशेष प्रसिद्धिपत्रक काढून नागरिकांना सतर्क केले आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


अग्निशमन दल सतर्क
मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या कामांवरील (उदा. कोस्टल रोड, मेट्रो) क्रेन आणि उंचावरील कामे वादळी वाऱ्याच्या काळात तात्पुरती थांबवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सोबतच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेच्या वॉर्ड वॉर रूम्सना हवामान खात्याचे अपडेट्स सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे. ३ एप्रिलपासून हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता असली, तरी पुढील ७२ तास मुंबईकरांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT