मुंबई

कारच्या धडकेत रिक्षातील महिलेचा मृत्यू

CD

मुंबई, ता. ३१ ः भरधाव कारच्या धडकेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ७च्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूरच्या अमरमहल

उड्डाणपुलाजवळ घडला.

नेहरूनगर पोलिसांनी याप्रकरणी अपघातास जबाबदार असलेल्या अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक वीरेंद्र प्रसाद (वय ४२) गोवंडी येथून चांदबी शेख (६५) आणि हाफिजा शेख (३५) या दोन प्रवासी महिलांना घेऊन चुनाभट्टी येथील एका खासगी रुग्णालयात जात होते. त्यांची रिक्षा द्रुतगती मार्गावर पोस्टल कॉलनीजवळ असताना एका भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षा वेगाने दुभाजकाला जाऊन आदळली. या धडकेमुळे रिक्षाचालकासह दोन्ही प्रवासी महिला गंभीररीत्या जखमी झाल्या. पोलिसांनी अन्य वाहनचालकांच्या मदतीने तिघांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच हाफिजा यांना मृत घोषित करण्यात आले. उर्वरित दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT