

India oil stock update
ESakal
गेल्या काही महिन्यांपासून मध्य-पूर्वेतील तणावाचा अनेक देशांवर परिणाम होत आहे. परिणामी भारतात अलीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे एलपीजी, इतर गॅस आणि खतांच्या किमतीही लवकरच वाढू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. केंद्र सरकारने आता या संदर्भात एक नवीन माहिती दिली आहे. देशात पुरेसा गॅस साठा असल्याचे सरकारने आश्वासन दिले आहे.