मुंबई

कारची रिक्षाला धडक; प्रवासी महिलेचा मृत्यू

CD

कारची रिक्षाला धडक; प्रवासी महिलेचा मृत्यू
चालकासह अन्य महिला जखमी

मुंबई, ता. ३१ ः भरधाव कारच्या धडकेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ७च्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूरच्या अमरमहल उड्डाणपुलाजवळ घडला.
याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अपघातास जबाबदार असलेल्या अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक वीरेंद्र प्रसाद (वय ४२) गोवंडी येथून चांदबी शेख (६५) आणि हाफिजा शेख (३५) या दोन प्रवासी महिलांना घेऊन चुनाभट्टी येथील एका खासगी रुग्णालयात जात होते. त्यांची रिक्षा द्रुतगती मार्गावर पोस्टल कॉलनीजवळ असताना एका भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षा वेगाने दुभाजकाला जाऊन आदळली. या धडकेमुळे रिक्षाचालकासह दोन्ही प्रवासी महिला गंभीररीत्या जखमी झाल्या. पोलिसांनी अन्य वाहनचालकांच्या मदतीने तिघांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच हाफिजा यांना मृत घोषित करण्यात आले. उर्वरित दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT