मुंबई

नालेसफाईसाठी स्वयंसेवी संस्थांना संधी

CD

नालेसफाईसाठी स्वयंसेवी संस्थांना संधी; लॉटरी पद्धतीने होणार निवड
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : महापालिकेच्या विविध ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्या, छोटे नाले, रस्त्यालगतची गटारे आणि बॉक्स कल्व्हर्ट्समधील गाळ काढण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पावसाळापूर्व आणि पावसाळ्यादरम्यानच्या कामांसाठी स्वयंसेवी संस्था आणि मजूर सहकारी संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एस विभागातील प्रभाग क्र. १०९ ते १२२ या प्रभागांतील कामे अशा पद्धतीने केली जाणार आहेत.
​महापालिकेने मंगळवारी यासाठीच्या निविदा जाहीर केल्‍या आहेत. ​या उपक्रमांतर्गत एस विभाग कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत स्थानिक मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था, स्थानिक मंडळे आणि बचत गटांना कामाची संधी मिळणार आहे. पालिकेकडून प्राप्त अर्जांची छाननी करून एक पात्रता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर लॉटरी पद्धतीने संस्थांची अंतिम निवड केली जाईल.
महापालिकेने या कामांंबाबतचे महत्त्वाचे तपशील जाहीर केले असून, कामाचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ (६ महिने) असा असणार आहे. २ एप्रिलपर्यंत अर्ज वितरण व स्वीकृती प्रक्रिया सुरू राहील. इच्छुक एस विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) यांनादेखील संपर्क करू शकतात.
​​इच्छुक संस्थांना अर्ज सादर करताना संस्थेचे अध्यक्ष, सचिव किंवा खजिनदार यांनी सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. पडताळणी न झालेले अर्ज बाद ठरवले जातील. ज्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाले आहेत, त्यांनी धर्मादाय आयुक्त किंवा संबंधित प्राधिकरणाकडील बदलाचा अधिकृत पुरावा सादर करणे आवश्यक आहे; केवळ अर्जाची प्रत ग्राह्य धरली जाणार नाही. परिस्थितीनुसार कामाचा कालावधी किंवा कामगारांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार पालिका प्रशासनाने राखून ठेवले आहेत.

निविदेत पारदर्शकता
एस विभागातील नाल्यांच्या स्वच्छतेसाठी आणि पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी पालिकेने ही निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे ठरवले आहे. इच्छुक संस्थांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक अभियंता (परिरक्षण) एस विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT