मुंबई विमानतळावर ॲपआधारित डिलिव्हरी
भारतातील पहिली सेवा सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : घाईघाईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता विसरलेला चार्जर, जलदपणे स्नॅक किंवा पाण्याची बाटली केवळ एका टॅपसह उपलब्ध होईल. मुंबई विमानतळावर प्रत्यक्ष ॲपआधारित डिलिव्हरी सुरू झाली असून, प्रवाशांना त्यांच्या गरजेच्या वस्तू ब्लिंकिट ॲपद्वारे मागवता येणार आहेत. ही भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा आहे.
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने ब्लिंकिटसोबत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या टर्मिनल २, डोमेस्टिक डिपार्चर येथे सुरू झाली आहे. प्रवासी आता त्यांच्या गरजेच्या वस्तू ब्लिंकिट ॲपद्वारे मागवू शकतात आणि या वस्तू त्यांना टर्मिनलमध्ये बोर्डिंग गेट्स, लाउंज, फूड कोर्ट आणि ठरावीक भागीदार आऊटलेट्स अशा ठिकाणी पोहोचवल्या जातील. या सुविधेमध्ये प्रवासासाठी लागणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, स्नॅक्स, पुस्तके, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी लागणारी उत्पादने आणि वैयक्तिक गरजांच्या वस्तूंचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. हे तत्काळ प्रतिसाद देणारी आणि प्रवासी अभिमुख विमानतळे उभारण्याच्या दिशेने पाऊल आहे, असे एएएचएलच्या प्रवक्त्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.