‘एनसीएमसी’मुळे होईल डिजिटल क्रांती!
एसटीच्या कार्डचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्याच्या एसटीसारख्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी एनसीएमसी कार्ड उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा मिळेल आणि एसटी महामंडळाच्या कामकाजातही अधिक कार्यक्षमतेने सुधारणा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘रूपे आॅन द गो’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे. राज्यातील सर्व आगार व बस स्थानकांवर नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय सुमारे तीन हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
...
टॉप-अपची सुविधा
या स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना वॉलेट टॉप-अपची सुविधा उपलब्ध राहणार असून, किमान १०० रुपयांपासून टॉप-अप करता येणार आहे. कार्डधारकांना बसमधील ईटीआयएम मशीन, संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच अधिकृत एजंटमार्फत टॉप-अप करता येईल. नवीन एनसीएमसी कार्ड कार्डची किंमत १९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
...
एनसीएमसी कार्ड उपक्रमामुळे राज्यातील लाखो सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटीच्या सेवांचा वापर अधिक सोईस्कर व आधुनिक पद्धतीने करता येईल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.