मुंबई

अनिल अंबानींविरोधात आणखी एक गुन्हा

CD

अनिल अंबानींविरोधात आणखी एक गुन्हा
सीबीआयकडून तपास सुरू

मुंबई, ता. १ ः उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी आणखी एक फसवणूक, आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला. ही कारवाई जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) तक्रारी आधारे करण्यात आल्याचे सीबीआय प्रवक्त्याने स्पष्ट केले.
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीची आर्थिक स्थिती, मालमत्ता, विविध बँका आणि वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची हमी याबाबत चुकीची माहिती देत नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या (एनसीडी) स्वरूपात तब्बल ४,५०० कोटींची गुंतवणूक करून घेतली; मात्र २०२०मध्ये झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कंपनीने स्वतःच्या आर्थिक स्वास्थ्याबाबत खोटी, चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने बँका आणि वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्ज रकमांचा गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले. या ऑडिट अहवालाचा आधार घेत एलआयसीने रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने फौजदारी स्वरूपाचा कट रचून ४,५०० कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३,७५० कोटींची फसवणूक केली, अशी तक्रार केली होती. अलीकडच्या काळात अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात सीबीआयने नोंदवलेला हा चौथा गुन्हा असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

SCROLL FOR NEXT