

Royal Challengers Bengaluru in Playoff | PBKS vs RCB | IPL 2026
Sakal
IPL 2026, RCB beat PBKS, Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये दाखल होणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिला संघ ठरला आहे. बंगळुरूने रविवारी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सला २३ धावांनी पराभवाचा धक्का दिला.
हा बंगळुरूचा १३ सामन्यांतील ९ वा विजय ठरल्याने त्यांनी पाँइंट्स टेबलमधील पहिले स्थान १८ गुणांसह कायम केले. तसेच प्लेऑफसाठीची पात्रताही (Qualify for IPL 2026 Playoff) यामुळे त्यांना मिळाली आहे. मात्र पंजाब किंग्सचा हा सलग ६ वा पराभव ठरला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील वाट आता बिकट झाली आहे.
या सामन्यात बंगळुरूने विजयासाठी पंजाब किंग्ससमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला २० षटकात ८ बाद १९९ धावाच करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंगने अर्धशतक करत झुंज दिली, पण त्याला संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.