म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी दोन दिवसांत ३,३६२ अर्ज
१,४१७ जणांनी ‘अनामत’ भरली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : म्हाडाने मुंबईतील घरांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लाॅटरीला सर्वसामान्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अवघ्या दोन दिवसांत ३,३६२ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी जवळपास १,४१७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरत आपला अर्ज अंतिम केला आहे. त्यामुळे या लाॅटरीतील घरांसाठी मुंबईकरांमध्ये मोठी स्पर्धा रंगणार असल्याचे चित्र आहे.
मुंबईत म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असली तरी म्हाडाने २०२५मध्ये घरांची सोडत काढली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य म्हाडाच्या लाॅटरीच्या प्रतीक्षेत होते. म्हाडाने नुकत्याच जाहीर केलेल्या २,६४० घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत ३,३६२ अर्ज आल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या लाॅटरीकरिता २९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार असल्याने सव्वा-दीड लाख अर्ज येतील, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. २०२४मध्ये २,०२० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लाॅटरीला एक लाख १३ हजार अर्ज आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.