मुंबई महापालिकेत ‘महिलाराज’
महापौर, आयुक्त ते समिती अध्यक्ष पदावर वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महापालिकेत २५ वर्षांनंतर सत्तांतर झाल्यानंतर महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रथमच मेट्रो वूमन अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे, तर महापौर म्हणून रितू तावडे, बेस्ट समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्षपदी महिलांची वर्णी लागल्याने मुंबई महापालिकेत खऱ्या अर्थाने महिलाराज आले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनी आपली छाप सोडली आहे. मुंबईतील २२७ प्रभागासाठी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल १३५ महिला विजयी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत महिलांचा बोलबाला आहे. त्यातच महापौर महिला, विविध समित्यांवर महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. महापालिकेत प्रथमच महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महापालिकेत आयुक्तपदी महिलेची वर्णी लागली असून, बहुतांश समिती अध्यक्षपदी महिलांची वर्णी लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत महिलाराज आले आहे.
अशा झाल्या नियुक्त्या
- महापौर - रितू तावडे
- पालिका आयुक्त - अश्विनी भिडे
- अतिरिक्त आयुक्त - अश्विनी जोशी
- विरोधी पक्षनेते - किशोरी पेडणेकर
- बेस्ट समिती अध्यक्ष - तृष्णा विश्वासराव
-शिक्षण समिती अध्यक्ष-राजश्री शिरवडकर
-सुधार समिती अध्यक्ष-संध्या दोशी
-महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष-मीनल तुडे
महिला व बालकल्याण समिती उपाध्यक्ष-रिटा मकवाना
- विधी समिती अध्यक्ष-दीक्षा कारकर
- बाजार व उद्यान समिती अध्यक्ष-हेतल गाला
- स्थापत्य समिती शहर सभापती-यामिनी जाधव
- स्थापत्य समिती उपनगर सभापती-संगीता शर्मा
- एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष-आशा मराठे
- एन प्रभाग समिती अध्यक्ष-अश्विनी मते
- एस टी प्रभाग समिती अध्यक्ष-साक्षी दळवी
- एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष-खैरनुसा अकबर हुसेन
सभागृहात आवाज महिलाचाच
मुंबई महापालिकेत २२७ पैकी १३५ सर्वपक्षीय महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. मुंबई महापालिकेची महत्त्वाची स्थायी समिती असो वा अन्य समिती त्याठिकाणी अध्यक्ष सदस्य महिला आहेत. मुंबई महापालिकेच्या सभागृहात महिलांची संख्या अधिक असल्याने सभागृहात महिलांचा बोलबाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.