मुंबई

पाणी संकटाची चाहूल!

CD

पाणी संकटाची चाहूल!
सातही धरणांतील साठा घसरला; पालिका प्रशासन सतर्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, आजच्या (ता. २) आकडेवारीनुसार एकूण उपयुक्त साठा केवळ ३८.८६ टक्के शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (३५.०६ टक्के) साठा किंचित जास्त असला तरी, उन्हाळ्याचे दोन मुख्य महिने शिल्लक असल्याने पालिकेसमोर पाणी नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
​मुंबईला दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. महापालिकेच्या हायड्रोलिक इंजिनिअर विभागाने दिलेल्या अहवालानुसार तानसा, मोडक सागर यांसारख्या महत्त्वाच्या धरणांमधील साठा ३५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. २०२४ मध्ये याच काळात साठा केवळ २९.५७ टक्के होता, त्या तुलनेत यंदा परिस्थिती स्थिर वाटत असली तरी बाष्पीभवनाचा वेग वाढल्यास अडचण येऊ शकते.
​​पालिकेच्या नियमांनुसार, मे महिन्यापर्यंत साठा अपेक्षित पातळीपेक्षा खाली गेला, तर ५ टक्के ते १० टक्के पाणीकपात लागू केली जाते. सध्या ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याने पालिका प्रशासन राज्य सरकारकडे राखीव साठ्यातून पाणी मिळवण्यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या अखेरीस आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

​मनोरी प्रकल्प कोठे अडकला?
​मुंबईची भविष्यातील तहान भागवण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला मनोरी येथील खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. या प्रकल्पासाठी जवळपास १२ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. सीआरझेड परवानग्या, पर्यावरणाचे दाखले आणि प्रकल्पाचा वाढलेला खर्च (सुमारे ३,५०० कोटींपेक्षा जास्त अपेक्षित) त्‍यामुळे कामाची गती मंदावली आहे. या प्रकल्पातून सुरुवातीला दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याचे उद्दिष्ट आहे, जे भविष्यात ४०० दशलक्ष लिटरपर्यंत नेले जाऊ शकते. सध्या हा प्रकल्प कागदोपत्री प्रक्रियेतून बाहेर पडून प्रत्यक्ष बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. पालिकेने यावर्षीच्या अर्थसंकल्‍पात यासाठी तरतूद केली असली तरी, २०२६ च्या उन्हाळ्यात या प्रकल्पाचा थेट फायदा मुंबईकरांना मिळण्याची शक्यता धुसर आहे.

​मुंबईकरांना जूनच्या पावसापर्यंत पाणी पुरवण्यासाठी पालिकेला आता भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांमधील राखीव साठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पाण्याची सद्यःस्थिती
धरण आजचा उपयुक्त साठा (दशलक्ष लिटर) टक्केवारी (%)
अप्पर वैतरणा /९५,८६४ /४२.२२%
मोडक सागर /४४,१५७ /३४.२५%
तानसा /४८,१५३ /३३.१९%
मध्य वैतरणा /७९,९१८ /४१.२९%
भातसा /२,७४,५७२ /३८.२९%
विहार /१६,२३५ /५८.६२%
तुळशी /३,५८७ /४४.५९%
एकूण साठा /५,६२,४८६ /३८.८६%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

SCROLL FOR NEXT