निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची चिन्हे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे निर्माण झालेला तणाव कायम असताना, शासन स्तरावर महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. २) झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ निवासी पदांमधील त्रुटी दूर करून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून, पुढील टप्पे प्रलंबित आहेत. तसेच सुमारे १,१०० ट्युटर पदांसाठी गुणवत्ता आधारित भरती केली जात आहे. जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत आंतरजिल्हा बदलीबाबतही शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. १९ डिसेंबरपूर्वी अर्ज केलेल्या डॉक्टरांना बदली देण्यासाठी शासन निर्णय काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘आम्ही बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ठेवली आहे. समाधान न झाल्यास पुढील स्तरावर लढा सुरू ठेवणार आहोत,’ असे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर संघटनेचे सदस्य डॉ. अथर्व शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.