मुंबई

कोळीवाडा-गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्या ः गायकवाड

CD

कोळीवाडा-गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्या ः गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांना घरांच्या पुनर्बांधणीसाठी परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली.
लोकसभेतील चर्चेदरम्यान त्यांनी खार दांडा परिसरातील अनेक इमारती जीर्णावस्थेत असून, त्या धोकादायक बनल्या असल्याचे सांगितले. येथील रहिवाशांना पुनर्बांधणी तसेच नवीन घरे उभारण्यासाठी त्वरित परवानगी मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रश्न मुंबई विकास नियमावलीत स्पष्ट धोरण नसल्यामुळे प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेचे काही नियम लागू होत नसल्याने स्थानिकांना बांधकाम परवानग्या मिळत नाहीत आणि याचा गैरफायदा काही असामाजिक घटक घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मूळ मुंबईकरांच्या घरांच्या हक्काबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
...
लोकलमधील गर्दी
मुंबई उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही त्यांनी सभागृहात मांडला. लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत विविध कामे सुरू असल्याची माहिती दिली. सिग्नल यंत्रणेत सुधारणा, फलाटांची क्षमता वाढवणे तसेच उपनगरी सेवांचा विस्तार यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT