मुंबई

फसवणूक करणाऱ्या शाळांना चाप

CD

फसवणूक करणाऱ्या शाळांना चाप
शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली

मुंबई, ता. २ ः राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक मंडळाची मान्यता घेऊन आपल्या नावापुढे इंटरनॅशनल स्कूल, सैनिकी शाळा, ऑक्सफर्ड स्कूल, ग्लोबल स्कूल, वर्ल्ड स्कूल, युनिव्हर्सल स्कूल आणि कॉन्व्हेन्ट स्कूल असे नाव वापरणाऱ्या आणि त्यासाठीची जाहिरात करून पालकांना फसवणाऱ्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना चाप लागणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर केली आहे.
या नियमावलीत आय. बी. केंब्रिज/आय.जी.सी.एस.ई. इत्यादी आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न असलेल्या किंवा सदर आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न होण्यास इच्छुक असलेल्या शाळांनाच केवळ शाळेच्या नावामध्ये ‘इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो’ यासारख्या शब्दांचा वापर करता येईल. राज्य आणि केंद्रीय मंडळाची मान्यता असलेल्या शाळांना असे कोणतेही नाव यापुढे वापरता येणार नसल्याचे आदेश आज शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर राज्य आणि केंद्रीय मंडळाच्या मान्यतेने चालणाऱ्या शाळा आणि शिक्षण संस्थांनी इंटरनॅशनल स्कूल, सैनिकी शाळा, ऑक्सफर्ड स्कूल, ग्लोबल स्कूल, वर्ल्ड स्कूल, युनिव्हर्सल स्कूल इत्यादी नावे वापरल्याच्या तक्रारी वाढल्याने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात आणि विशेषतः शहरी भागात अनेक खासगी शाळा त्यांच्या नावात इंटरनॅशनल हा शब्द वापरत असून, त्यामुळे शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, असा गैरसमज निर्माण होत असल्याची बाब समोर आली होती.
...
असे होतील बदल
- खिश्चन नन्स समुदायास ‘कॉन्व्हेंट’ असे संबोधले जात असून, या समुदायाद्वारे संचलित करण्यात येणाऱ्या शाळा या प्रामुख्याने ‘कॉन्व्हेंट स्कूल’ समजण्यात येतात. अन्य संस्था/न्यास/कंपनी यांच्याद्वारे स्थापित करण्यात येणाऱ्या शाळांना ‘कॉन्व्हेंट’ शब्दाचा वापर शाळेच्या नावात करता येणार नाही.
- सैनिकी शाळा म्हणून मान्यताप्राप्त शाळांनाच शाळेच्या नावात सैनिकी शब्दाचा वापर करता येईल.
- ज्या शैक्षणिक मंडळाशी संलग्न होण्यासाठी शाळा स्थापन करावयाची आहे, त्या शैक्षणिक मंडळाचा उल्लेख शाळेच्या नावात करता येईल.
- विद्यार्थी, पालक, नागरिक, व्यक्तींची दिशाभूल होणाऱ्या शब्दांचा वापर शाळेच्या नावात करता येणार नाही; अन्यथा शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT