मुंबई

शाळांच्या मुदतवाढीचा निर्णय तातडीने घ्या

CD

शाळांच्या मुदतवाढीचा निर्णय तातडीने घ्या
राजेश्री शिरवडकर यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मराठी माध्यमासह अन्य माध्यमांच्या ३०६ शाळांची मान्यता मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. या शाळांना मान्यता मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय तातडीने घ्या, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
शिक्षण खात्याकडे सन २०२५-२०२६ करिता मराठी माध्यमासह अन्य भाषिक शाळांचे एकूण ३०६ मान्यता मुदतवाढीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समजते. या संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सादर केलेल्या विविध कागदपत्रांची पडताळणी करुन मान्यता मुदतवाढीचे निकष पूर्ण करीत असल्यास महापालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार त्यांचे प्रस्ताव निकालात काढणे आवश्यक आहे. या शाळा ३० ते ४० वर्षे जुन्या असून दर पाच वर्षांनी संबंधित संस्थांकडून विहित वेळेत प्रस्ताव सादर करण्यात येत असतात. त्यामुळे अशा प्रस्तावांना विलंब करणे योग्य नाही. तरी या शाळांचे मान्यता मुदतवाढीचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने शिक्षण समितीपुढे सादर करण्यात यावेत, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT