दादर-रत्नागिरी रेल्वेसाठी प्रतीक्षा कायम
पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण झाल्यावरच निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कोकणवासीयांची पसंतीची दादर-रत्नागिरी रेल्वे पुन्हा दादर स्थानकावरून सुरू होण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. सीएसएमटी-कुर्ला यादरम्यान सुरू असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिका प्रकल्पाच्या पूर्णतेनंतरच या गाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे प्रतीक गोस्वामी यांनी सीएसएमटी येथे झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांना ही माहिती दिली. या वेळी लोकल गाड्यांचा विलंब, १५ डब्यांच्या लोकलचा विस्तार तसेच दादर-रत्नागिरी गाडीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
दादरऐवजी ही गाडी दिवा स्थानकावरून सुरू केल्यामुळे दक्षिण मुंबई, लालबाग, परळ तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही गाडी पुन्हा दादरवरून सुरू करावी, अशी मागणी होत आहे. यावर गोस्वामी म्हणाले, की सीएसएमटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित होईल. त्यानंतरच दिवा-रत्नागिरी गाडी दादरवरून चालविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या दादरवरून ही गाडी चालविल्यास उपनगरी लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे २०२१ मध्ये ही गाडी दिवा स्थानकावरून चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकल गाड्यांची वक्तशीरता सुधारण्यासाठी विविध पायाभूत कामे सुरू असून, प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.