मुंबई

पालिकेचे अर्ली इंटरवेंशन सेंटर ऑटिझम असलेल्या ६०० मुलांसाठी आधार, एकाच छताखाली सुविधा उपलब्ध, विशेष गरजा असलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध

CD

पालिकेचा विशेष मुलांना आधार
पुनर्वसन केंद्रात एकाच छताखाली सुविधा आणि उपचार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे सुरू करण्यात आलेले महापालिकेचे ‘अर्ली इंटरव्हेन्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ म्हणजेच प्रारंभिक उपचार व पुनर्वसन केंद्र हे ऑटिझम (स्वमग्नता) आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी मोठा आधार ठरत आहे. गेल्या अडीच वर्षांत या केंद्राने सुमारे ६०० मुलांना सेवा दिली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या केंद्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व आवश्यक उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी हे केंद्र दिलासा देणारे ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास या मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. हे केंद्र नायर रुग्णालयाच्या अंतर्गत कार्यरत असून, पाळणाघर पद्धतीने चालते. येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत विशेष मुलांवर विविध प्रकारचे उपचार केले जातात. यामध्ये वर्तन सुधारणा, संवाद कौशल्य वाढवणे आणि दैनंदिन जीवनातील कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो.

या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित थेरपिस्टचे पथक उपलब्ध आहे. बालरोग, वाक् उपचार (स्पीच थेरपी), व्यावसायिक उपचार (ऑक्युपेशनल थेरपी), नेत्ररोग आणि अस्थिरोग अशा विविध विभागांद्वारे मुलांना समग्र सेवा दिली जाते. तसेच, मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी खेळ आणि उपक्रमांवरही विशेष लक्ष दिले जाते.

याशिवाय, पालकांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात. यामध्ये मुलांची योग्य काळजी कशी घ्यावी, त्यांच्याशी संवाद कसा साधावा आणि घरच्या घरी कोणते उपक्रम करावेत, याबाबत माहिती दिली जाते. एकूणच, हे केंद्र विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT