मुंबई

सायन रुग्णालयात सुरक्षा यंत्रणांचे ऑडिट

CD

सायन रुग्णालयात सुरक्षा यंत्रणांचे ऑडिट
आगीच्या सलग घटनांनंतर प्रशासन सतर्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : सायन येथील महापालिकेच्या रुग्णालयात अलीकडे घडलेल्या गॅसगळती आणि आगीच्या घटनांनंतर प्रशासन सतर्क झाले असून, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची सर्वसमावेशक तपासणी (ऑडिट) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत सर्व विद्युत उपकरणे आणि अग्निसुरक्षा प्रणालींची तपासणी केली जाणार आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या रेडिओलाॅजी विभागाच्या इमारतीचे ऑडिट सुरू केले असून, टप्प्याटप्प्यात सर्व इमारतींचे ऑडिट केले जाणार आहे. पहिली घटना २४ मार्चला घडली होती. रुग्णालयाच्या गेट क्रमांक एक जवळ गॅस पाइपलाइन फुटल्याने गळती झाली. ही पाइपलाइन बांधकाम कामादरम्यान फुटली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर ३१ मार्चला रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीतील एक्स-रे विभागात आग लागण्याची घटना घडली.
प्राथमिक तपासात एसी युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेतही कोणीही जखमी झाले नाही. या सलग घटनांनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णालयातील सर्व विद्युत यंत्रणा, वायरिंग, तसेच अग्निशामक उपकरणांची तपासणी केली जाणार आहे. काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर करून सुरक्षा मानके अधिक मजबूत केली जातील.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २०२३ मध्ये सायन, नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत काही ठिकाणी कालबाह्य अग्निशामक उपकरणे, तसेच फायर अलार्म प्रणालीतील त्रुटी आढळून आल्या होत्या. संबंधित रुग्णालयांना याबाबत नोटिसा देऊन सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या उपाययोजनांमुळे रुग्णालयातील रुग्ण, त्यांच्या नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

रुग्‍णालयाचे म्हणणे काय?
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, या घटनांची गंभीर दखल घेऊन सध्या सविस्तर ऑडिट करण्यात येणार आहे. साधारणपणे दर पाच वर्षांनी अग्निसुरक्षा तपासणी केली जाते. मात्र, अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. दुसऱ्या वेळेस लागलेल्या आगीत सर्व उपाययोजना होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

SCROLL FOR NEXT