मुंबई

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईचा बडगा

CD

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईचा बडगा
आरटीओकडून १३.८५ कोटींची दंडवसुली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर आरटीओने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या वर्षी दीड लाख वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये दोषी २४ हजार वाहनचालकांकडून १३.८५ कोटी रुपयांची दंडवसुली केली.
सणासुदीसह सुट्टीच्या कालावधीत प्रवासासाठी खासगी बसला प्रवाशांची पसंती असते. प्रवासी मागणी लक्षात घेऊन वाजवीपेक्षा अधिक भाडे वसूल करणे, प्रवासी सुरक्षेत तडजोड करणे, अतिरिक्त प्रवासी बसवणे आणि अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल्सकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोर्चा वळवला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदार मंडळींचे दलाल थेट एसटी डेपोत शिरून प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळवत असल्याच्या तक्रारी अनेकदा येत असातात. अशा बसचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार व मोटार वाहन कायद्यानुसार एसटी बस स्थानकाच्या २०० मीटर क्षेत्रात खासगी प्रवासी वाहने उभी केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय एसटीच्या अधिकृत थांब्यावर खासगी वाहने उभी केल्यास कारवाई केली जात आहे. खासगी वाहनाची योग्य देखभाग, दुरुस्ती न करता प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.
...
काय होते तपासणी?
परिवहन विभागाच्या खासगी बस तपासणी मोहिमेत विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेकटर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर, वाहनांमध्ये बेकायदा फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर, जादा भाडे आकारणे आदी बाबींची तपासणी करण्यात आली.


..
वाहनचालकांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करावे, वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून, नियमित तपासणी मोहीम सुरू आहे.
- भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT