मुंबई

मुंबईत ९, १० एप्रिलला पीव्हीसी शिखर परिषद

CD

मुंबईत ९, १० एप्रिलला पीव्हीसी शिखर परिषद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः भू-राजकीय तणाव, अस्थिर व्यापारप्रवाह, किमतीतील चढ-उतार आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, जागतिक पीव्हीसी उद्योग एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभा असून या काळात ‘वायनल इंडिया २०२६’ ही जगातील सर्वात मोठी पीव्हीसी शिखर परिषद व प्रदर्शन ९ व १० एप्रिलला मुंबईत होत आहे.
यंदाची ही १३वी शिखर परिषद असून यामध्ये १,२०० पेक्षा अधिक प्रतिनिधी, ५३० पेक्षा अधिक संस्था आणि २०हून अधिक देश सहभागी होणार आहेत. पीव्हीसी क्षेत्रातील हे एक सर्वात प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत जागतिक स्तरावरील वक्ते सहभागी होणार असून विविध व्यावसायिक सत्रे व पॅनेल चर्चांमधून अनेक विषयांवर चर्चा होईल. पीव्हीसीचे भविष्यातील रोडमॅप, जागतिक व भारतीय आर्थिक परिदृश्य, शेती व जलसुविधांमधील मागणी, व्यापारावर भूराजकीय परिणाम, किंमत अस्थिरता व पुरवठा साखळी, शाश्वतता व वर्तुळाकार अर्थव्यवस्था, नवकल्पना व भविष्यातील नावीन्यपूर्णता तसेच रसायन उद्योगातील एआयचा प्रभाव या विषयांवर चर्चा झडणार आहे.
ही परिषद पीव्हीसी रेझिन उत्पादक, पाइप व प्रोफाइल उत्पादक, कन्व्हर्टर्स व कंपाउंडर्स, ॲडिटिव्हज व केमिकल कंपन्या, यंत्रसामग्री उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, व्यापारी आणि जागतिक ट्रेडर्स, संपूर्ण पीव्हीसी मूल्य साखळीतील घटकांना एकत्र आणणारे धोरणात्मक व्यासपीठ ठरेल. हे क्षेत्र सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे असून २०३०पर्यंत ते जवळपास ५० हजार कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT