मुंबई

येमेन नागरिकाच्या व्हिसाबाबत त्वरित निर्णय घेण्याचे आदेश

CD

येमेन नागरिकाच्या व्हिसाबाबत त्वरित निर्णय घेण्याचे आदेश

मुंबई, ता. ३ : मूळचा येमेन नागरिक असलेल्या आणि सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या व्यक्तीच्या प्रलंबित व्हिसा मुदतवाढ अर्जावर त्वरित निर्णय घ्या, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
फहद रेडहवान अब्दुल्ला सईद असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी हरजिंदर कौर यांनी दाखल केलेल्या याचिकेची नुकतीच न्या. सारंग कोतवाल आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नोव्हेंबर २०२३मध्ये विदेशी व्यक्ती १९४८ अधिनियमांतर्गत फहदच्या हालचालींवरील निर्बंधाचे आदेश लागू होते. सध्या त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत; मात्र वैध कागदपत्रांशिवाय भारतातील त्यांचा मुक्काम हा वादाचा मुद्दा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. विशेष परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला भारतीय परदेशी नागरिक (ओसीआय) म्हणून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे व्यापक अधिकार आहेत, असे न्यायालयाने नमूद केले. फहादचा भारतातील दीर्घकाळचा मुक्काम, भारतीय नागरिक असलेली पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा विचार करून अधिकाऱ्यांनी त्यांचा व्हिसा मुदतवाढ अर्ज त्वरित आणि शक्य असल्यास आठ आठवड्यांत निकाली काढावा, असे अंतरिम आदेशही खंडपीठाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT