मुंबई

स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मराठी माणूस मुंबईतच राहणार

CD

स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मराठी माणूस मुंबईतच राहणार
प्रवीण दरेकर यांचा विश्वास

मुंबई, ता. ३ ः वसई, विरार, नालासोपाऱ्याला जाण्याच्या तयारीत असलेला मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणूस आता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतच राहणार आहे, असा विश्वास मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे व्यक्त केला.
ते विक्रोळी (पूर्व) टागोरनगर ग्रुप एक येथील करुणा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतर्फे गुरुवारी आयोजित केलेल्या स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. या वेळी दरेकर म्हणाले, की स्वयंपुनर्विकासात एकही रुपया खिशातून घालावा लागत नाही. शासनाच्या सर्व परवानग्या विनाविलंब मिळतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ शासन निर्णय स्वयंपुनर्विकासाच्या सवलतींचे केले. स्वयंपुनर्विकासात सभासद हा शेवटपर्यंत मालक असतो. सर्व सूत्र, नियंत्रण हे तुमच्या हातात असते. चांगले दर्जेदार बांधकाम करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षाच्या आत प्रकल्प उभा राहिला पाहिजे, असा स्वयंपुनर्विकासाचा कायदा सरकारने केला आहे. एकापेक्षा जास्त इमारती एकत्र आल्या तर त्यांचा क्लस्टर पुनर्विकास होऊ शकतो. मुंबई जिल्हा बँकेकडे प्रस्ताव दिल्यानंतर मुंबई जिल्हा बँक सर्व फिजिबिलिटी रिपोर्ट बघून कर्ज मंजूर करते. त्यानंतर इमारतीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होते. भाड्याचे, प्रीमियमचे पैसे मिळतात. कन्नमवारनगर, टागोरनगर येथे राहणारा माणूस कष्टकरी, मध्यमवर्गीय आहे. आंबेडकरी चळवळीचे लोक मोठ्या प्रमाणावर येथे राहतात. म्हणून कष्टकऱ्यांसाठी ही वसाहत उभी करायची आहे. आपण सर्व जण मिळून ही योजना यशस्वी करू, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT