‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे
पन्नास टक्के जागेवर उभारणार विक्रीयोग्य इमारती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासातून रहिवाशांबरोबरच म्हाडाही मालामाल होणार आहे. २७ हजार ६२५ चौरस मीटरचा संपूर्ण भूखंड असून, त्यापैकी जवळपास ५० टक्के जागेवर रहिवाशांकरिता पुनर्वसन इमारती उभारल्या जाणार असून, उर्वरित अर्ध्या भूखंडावर विक्रीयोग्य सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यानुसार जवळपास ८०० ते ९०० सदनिका म्हाडाला उपलब्ध होऊ शकणार आहेत.
पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत १९९०च्या दशकात जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत उभारली असून, त्यामध्ये चारमजली १७ इमारती आहेत. त्यानुसार ९४२ निवासी आणि ४२ अनिवासी अशा एकूण ९८४ गाळे आहेत. राज्य सरकारच्या मंजुरीने या वसाहतीचा पूर्णविकास म्हाडा करणार आहे. त्यानुसार येथील रहिवाशांना ४५० चौरस फुटाची सुसज्ज सदनिका दिल्या जाणार आहेत. तर पुनर्वसन इमारतीशिवाय उर्वरित जागेवर जवळपास १७ मजली विक्रीयोग्य असलेल्या सदनिका उभारल्या जाणार असून, त्यामध्ये जवळपास ५५० सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठीच्या, तर ३०० ते ३५० सदनिका अल्प उत्पन्न गटासाठीच्या असणार आहेत. या सदनिकांची भविष्यात लाॅटरीद्वारे विक्री केली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्याने दिली.
इमारतींच्या उंचीवर मर्यादा
म्हाडाकडून सुमारे ४५० चौरस फूट आणि ६५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दोन प्रकारच्या सदनिका उभारण्याची योजना आहे. त्यानुसार जवळपास प्रत्येकी २०० सदनिकांच्या चार विंग असणार आहेत. तर प्रत्येक विंगमध्ये चार अशा एकूण १६ इमारती असतील. दरम्यान, फनेल झोनमुळे येथील इमारतींच्या उंचीवर मर्यादा येत असल्याने ५५ ते ५६ मीटर एवढी इमारतींची उंची असेल.
१७ मजली इमारती
- प्रकल्पाचा एकूण खर्च - ४५० कोटी
- ८००-९०० विक्रीयोग्य सदनिका
- अल्प उत्पन्न गट - ४५० चौरस फूट
- मध्यम उत्पन्न गट - ६५० चौरस फूट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.