मुंबई

प्राण्यांसाठी विशेष ‘कुलिंग’ उपाययोजना

CD

प्राण्यांसाठी विशेष ‘कुलिंग’ उपाययोजना
राणीबागेत वाढत्या उष्णतेचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : मुंबईतील तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका प्राणी-पक्ष्यांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत राणीबागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले, की प्राण्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने,​ प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये थंड हवा खेळती राहावी म्हणून कुलर्स आणि पाण्याचे फवारे लावण्यात आले आहेत. प्राण्यांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गरजेनुसार पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स किंवा ग्लुकोजचे द्रावण मिसळले जात आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहील. वाढत्या उष्णतेचा विचार करून प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला आहे. त्यांना पचायला हलका आणि थंड आहार दिला जात आहे. फळांचे प्रमाण वाढवण्यात आले असून, काही प्राण्यांना थंड दही किंवा आईस-कँडीसारखे पदार्थ दिले जात आहेत. पिंजऱ्यांच्या वरच्या भागात छप्पर आणि सावलीसाठी विशेष नेट लावण्यात आले आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाश प्राण्यांवर पडणार नाही. राणीबागेतील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असेही साटम यांनी सांगितले.

त्वरित वैद्यकीय उपचार
एखाद्या प्राण्याला सुस्तपणा किंवा अन्नाकडे पाठ फिरवल्यासारखी लक्षणे दिसल्यास, त्वरित वैद्यकीय उपचार सुरू केले जात आहेत. उन्हाळ्याच्या काळात प्राण्यांना त्रास होऊ नये, म्हणून राणीबाग प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पर्यटक पर्यटनासाठी आल्यावर प्राण्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT