मुंबई

विहिरी, कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करा

CD

विहिरी, कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करा
मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापौरांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी जल विभागाला शनिवारी (ता. ४) महत्त्वाचे निर्देश दिले. मुंबईतील जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करण्यावर महापौरांनी भर दिला आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि हवामानातील बदलांमुळे पाणी व्यवस्थापन आव्हानात्मक बनले आहे. यावर उपाय म्हणून महापौरांनी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय आणि खासगी विहिरी तसेच कूपनलिकांची अद्ययावत माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. २००९च्या पाणीटंचाईच्या धर्तीवर नादुरुस्त विहिरींची तातडीने दुरुस्ती करून त्या वापरात आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. केवळ स्वच्छता किंवा बागकामासाठीच नव्हे, तर योग्य चाचण्यांनंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल का, याचा अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ​पाणी बचतीसाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता खासगी गृहनिर्माण संस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले. परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची नियमित स्वच्छता व देखभाल करावी,​ आवश्यक तिथे जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून पाण्याचा वापर करावा,​ भविष्यातील जल सुरक्षेसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा सक्तीने राबवावी, असेही महापौरांनी या वेळी सांगितले.

कूपनलिकेच्या पाण्याचे शुद्धीकरण
माझ्या घाटकोपर येथील गृहनिर्माण संकुलात आम्ही पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण आणि कूपनलिकेच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते सर्व सदनिकांना पुरवतो. हा प्रयोग यशस्वी झाला असून, इतर सोसायट्यांनीही याचे अनुकरण करावे, असे उदाहरण महापौर रितू तावडे यांनी या वेळी दिले. प्रशासन, नागरिक आणि गृहनिर्माण संस्था यांच्यातील समन्वयातूनच मुंबईची जलसुरक्षा कायम राखता येईल. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पुनर्वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT