एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा
पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मध्य मुंबईतील सध्याच्या परळ आणि प्रभादेवी या भागांदरम्यान गेल्या ११३ वर्षांपासून प्रवाशांच्या वाहतुकीला दिशा देणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल रविवारी इतिहासजमा झाला. कामगारांनी या पुलाचे शेवटचे गर्डर काढून टाकले.
या कारवाईसह मुंबईसारख्या महानगरातील अत्यंत गजबजलेल्या सीएसएमटी-कुर्ला मार्गावर पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार करण्याच्या कामाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेने आतापर्यंत ब्रिटिशकालीन पाच रस्ते उड्डाणपूल पाडले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एल्फिन्स्टन पुलाचे शेवटचे उर्वरित गर्डर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर यांच्या दरम्यानच्या रेल्वेमार्गावर रात्रीच्या वेळी घेण्यात आलेल्या एका विशेष वाहतूक आणि वीज खंडाच्या कालावधीत पाडण्यात आले. यामुळे उपनगरी रेल्वे सेवांमध्ये किमान व्यत्यय येईल याची काळजी घेण्यात आली. सेवा सकाळी ७.३० वाजता पुन्हा सुरळीत सुरू झाल्या, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.
...
प्रवाशांना फटका
मध्य रेल्वेच्या मार्गावरील जुन्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम शनिवारी रात्री सुरू करण्यात आले. त्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला होता. सकाळी या पुलाचे पाडकाम पूर्ण झाले असले तरी ब्लॉक संपल्यानंतरही मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या, तर काही गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले होते. सकाळी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊन प्रवासी ताटकळत उभे होते. या सेवा सकाळी ७.३० वाजता पुन्हा सुरळीत सुरू झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.