मुंबई

महानगर प्रदेशातून गॅस सिलेंडर चोरणारा अटकेत

CD

गॅस सिलिंडर चोरणारा अटकेत
४५ सिलिंडरसह चोरीच्या तीन दुचाकी जप्त
मुंबई, ता. ५ ः मुंबईसह महानगर प्रदेशातून गॅस सिलिंडर चोरून ते विकणाऱ्या तरुणास पवई पोलिसांनी ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातून अटक केली. राज कांबळे असे या चोरट्यांचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी आणि ४५ सिलिंडर हस्तगत करण्यात आले.
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या बर्गमन दुचाकीचा शोध सुरू होता. त्याच सुमारास या दुचाकीचा वापर एक व्यक्ती रिकामे, भरलेले सिलिंडर चोरण्यासाठी करीत असल्याची माहिती महानगर प्रदेशातील काही पोलिस ठाण्यांनी पवई पोलिसांना कळवली. पवई पोलिस ठाण्यातही सिलिंडर चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर पुरवठा विस्कळित झाल्याने पवई पोलिसांनीही गुन्हे गांभीर्याने घेत तपास सुरू केला. तांत्रिक तपासाआधारे पवई पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष कांबळे, उपनिरीक्षक गणेश आव्हाड आणि पथकाने सीसीटीव्ही चित्रणाआधारे सिलिंडर चोरणारा राज कांबळे असल्याचे ओळखले. तांत्रिक तपासाआधारे या पथकाने कांबळेला वर्तकनगर येथून अटक केली.

दोन हजार रुपयांना विक्री
चालक चावी विसरून गेलेल्या दुचाकी कांबळे चोरत असे. त्याने कामोठे, शिवाजी पार्क आणि पवई येथील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून अशाच दुचाकी चोरल्या होत्या. त्याच दुचाकी वापरून तो सिलिंडरही चोरत होता. सिलिंडरची डिलिव्हरी देण्यासाठी एजन्सीचा कर्मचारी एखाद्या इमारतीत, वस्तीत शिरला की त्याच्या हातगाडी किंवा टेम्पोमधून हाती लागेल तो सिलिंडर उचलून कांबळे पळ काढत असे. याशिवाय भरलेला सिलिंडर आणून देतो, अशी थाप मारून तो व्यावसायिकांकडून रिकामे सिलिडर घेऊन पोबारा करी. चोरलेल्या सिलिंडरची तो भंगार व्यावसायिक, सिलिंडरचा काळाबाजार करणारे आणि अवैधरीत्या गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना दीड ते दोन हजार रुपयांना विकत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

SCROLL FOR NEXT