मुंबई

महापालिकेत प्रशासकीय फेरबदल

CD

महापालिकेत प्रशासकीय फेरबदल
चार नवीन अतिरिक्त आयुक्तांकडे नवी जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ६ : महापालिकेच्या प्रशासकीय रचनेत राज्य सरकारने महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सुधारित मुंबई महापालिका अधिनियमांतर्गत पालिकेतील चार अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या जबाबदारीत फेरबदल करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून या सर्व अधिकाऱ्यांनी नव्याने पदभार स्वीकारला असून, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्या खात्यांचे वाटपही जाहीर करण्यात आले आहे.
राज्य सरकारने डॉ. विपिन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, अभिजित बांगर आणि अविनाश ढाकणे या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. डॉ. विपिन शर्मा (पश्चिम उपनगरे) यांच्याकडे आरोग्य खाते, वैद्यकीय शिक्षण, कोविड जम्बो सेंटर्स, घनकचरा व्यवस्थापन आणि आयटी विभागाची धुरा असेल.​ डॉ. अश्विनी जोशी (शहर) यांच्याकडे सामान्य प्रशासन, मालमत्ता कर, अग्निशमन खाते, बेस्ट उपक्रम आणि महत्त्वाच्या धोरणात्मक विभागांचे कामकाज त्या पाहतील.​
अभिजित बांगर (प्रकल्प) हे मुंबईतील पाणीपुरवठा प्रकल्प, रस्ते, पूल, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि आर्थिक सुधारणांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्प विभागांचे नेतृत्व करतील, तर ​अविनाश ढाकणे (पूर्व उपनगरे) हे शिक्षण खाते, उद्यान, प्राणीसंग्रहालय, किनारी रस्ता (कोस्टल रोड) आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

आढावा घेण्यास सुरुवात
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे धोरणात्मक बाबी, विकास नियोजन आणि सर्व विभागांचे पर्यवेक्षण असणार आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात तत्काळ कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देणे आणि आगामी काळातील प्रशासकीय आव्हाने पेलण्यासाठी या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

Online Elocution: महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत गंगापूरच्या संस्कृती आळंजकरची राज्यात बाजी; प्रथम क्रमांकाने संजरपूरचे नाव उज्ज्वल

SCROLL FOR NEXT