मुंबई-विजयदुर्ग ‘रो-रो’ धक्क्याला
तीन इंजिन बंद; युद्धामुळे दुरुस्तीसाठी सुटे भाग मिळेनात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पश्चिम आशियातील युद्धाची झळ मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेपर्यंत पाेहाेचली आहे. इंजिन बिघाडामुळे दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा रखडल्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे. या जहाजाच्या चार इंजिनांपैकी तीन इंजिन बंद पडल्याने सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाने दिली आहे.
१ मार्च २०२६पासून एमटूएम फेरीज् प्रा.लि. कंपनीच्या ‘एमटूएम प्रिन्सेस’ या जहाजाद्वारे भाऊच्या धक्क्यावरून ही सेवा सुरू करण्यात आली होती. समुद्रामार्गे अवघ्या सहा-सात तासांत काेकणात जाता येत असल्याने कोकणवासीयांसाठी दिलासा मिळाला होता; मात्र अवघ्या सहा फेऱ्यांनंतरच सेवा बंद पडल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
सहाव्या फेरीदरम्यान मुंबईकडे येताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनात बिघाड झाला. चार इंजिनांपैकी तीन इंजिन बंद पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सेवा तातडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सागरी मंडळाने सांगितले.
युद्धामुळे दुरुस्ती रखडली
इंजिनांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भाग परदेशातून मागवण्यात आले आहेत. युद्ध परिस्थितीमुळे या साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून १५ दिवसांत हे भाग उपलब्ध होतील, असे सांगण्यात येते. त्यानंतर दुरुस्तीसाठी आणखी १० दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेमार्फत जहाजाची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मंडळाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.