पश्चिम रेल्वे २३० काेटींची दंडवसुली करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविराेधात पश्चिम रेल्वे प्रशासनाने कडक मोहीम हाती घेतली आहे. चालू आर्थिक वर्षात २२९ काेटी ९६ लाख रुपयांची दंडवसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नियमित तिकीट तपासणीसह विशेष पथके तैनात करून कारवाईला वेग देण्यात आला आहे.
कोरोनापूर्वी दररोज सरासरी ३४ लाख ८७ हजार रेल्वे प्रवासी होते. सध्या ही संख्या सुमारे २९ लाख ५२ हजारांवर आहे. लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्या आणि विशेष रेल्वेगाड्यांतही विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. २०२४-२५मध्ये पश्चिम रेल्वेने १८१ काेटी तीन लाख लक्ष्य ११ महिन्यांत पूर्ण केले होते. २०२५-२६मध्ये २०९ काेटी पाच लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली. यंदा हे लक्ष्य वाढवून २२९ काेटी ९६ लाख करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने स्थानक तपासणी, अचानक छापे, तटबंदी तपासणी, व्यापक तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमांद्वारे कारवाई तीव्र केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.