मुंबई

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद

CD

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद

शौचालय वापरावरून मारहाणीचा आराेप

मुंबई, ता. ६ : सार्वजनिक शाैचालयाच्या वापरावरून गुजराती व्‍यावसायिकांनी मारहाण केल्याची तक्रार घाटकाेपर पूर्वेतील मराठी तरुणाने पाेलिसांत केली आहे. अक्षय भांगरे असे या तरुणाचे नाव असून, त्याचाही व्‍यवसाय आहे. हा गाळा रिकामा करून घेण्यासाठी मालकाला पालिकेने साेमवारी नाेटीस बजावली आहे. त्यावरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्याने केला.

भांगरे याने २४ मार्चला केलेल्या तक्रारीआधारे पंतनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद करण्यात आली आहे. या नोंदीनुसार अक्षय भांगरे याने घाटकोपर पूर्वेकडील रायगड चौक परिसरात असलेल्या नालंदा इमारतीतील एक गाळा भाड्याने घेऊन एजन्सीचे कार्यालय थाटले आहे. इमारतीतील सार्वजनिक शौचालय वापरावरून त्याचा अन्य व्‍यावसायिकाशी वाद झाला. शौचालयाची दुसरी चावी का बनवली हे निमित्त करून एका गुजराती व्यावसायिकांनी अक्षय आणि त्यांच्या नातेवाइकाला मारहाण केली. यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी निखिल दोमाडीया यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेनंतर पालिकेच्या एन विभाग कार्यालयाने सोमवारी अक्षय व्यवसाय करत असलेल्या गाळ्याचे मूळ भाडेकरू प्रकाश मौर्य यांना नोटीस जारी केली. थकलेले भाडे आणि अनुज्ञापत्रात नमूद व्यवसाय सुरू नसल्याने तातडीने भाडेकरू अक्षय यांना गाळा रिकामा करण्यास सांगा, असे या नोटिशीत नमूद केले आहे.
----
मंडई विभागाचा
गाळा भाड्याने!
प्रत्यक्षात हा गाळा पालिकेच्या मंडई विभागामार्फत मौर्य यांना भाड्याने दिला आहे. मौर्य यांनी तो अक्षय यांना भाड्याने दिला आहे. पालिकेची नोटीस एकतर्फी असल्याचा आरोप अक्षय यांनी केला आहे. याबाबत एन विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मारुती पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT