मुंबई

विरार स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्तार पूर्ण; लवकरच १५ डब्यांच्या लोकलना थांबा!

CD

विरार स्थानकावर फलाटाचा विस्तार पूर्ण
लवकरच १५ डब्यांच्या लोकलना थांबा!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावरील फलाटाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता येथे १५ डब्यांच्या लोकल गाड्या सहज थांबू शकणार आहेत. या कामामुळे स्थानकाची प्रवासी क्षमता वाढणार असून, गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई रेल विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) अवघ्या चार महिन्यांत फलाट क्रमांक ३ए आणि ४ए यांची रुंदी सुमारे चार मीटरने वाढवली आहे. तसेच स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस नवीन फलाट क्रमांक ५ए उभारण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकल गाड्यांचे नियोजन अधिक सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्याने तयार करण्यात आलेले सर्व फलाट लवकरच पश्चिम रेल्वेच्या ताब्यात देण्यात येणार असून, त्यानंतर १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.


विरार-डहाणू मार्गावर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत विरार स्थानकावर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. भविष्यात वाढणाऱ्या प्रवासीसंख्येचा विचार करून स्थानकाची क्षमता वाढवणे, प्रवासी सुविधा सुधारणे आणि लोकल सेवांची वाढती मागणी पूर्ण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या कामांमुळे विरार-डहाणू रोड मार्गावरील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक भक्कम होणार असून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे. पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसी यांच्या समन्वयातून १५ डब्यांच्या लोकलची यशस्वी चाचणीही नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.
----------------

विरार स्थानकावरील क्षमता वाढीचे हे काम संपूर्ण विभागासाठी महत्त्वाचे आहे. प्रवाशांची सुरक्षितता राखत आणि कमीत कमी अडथळा निर्माण होईल याची काळजी घेत एमआरव्हीसी आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
- विलास वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT