मुंबई

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी पुढाकार

CD

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील गरजू बालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जनजागृती यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. टाटा मेमोरियल सेंटरने बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्याची मागणी केल्यानंतर, बीपीसीएल फाउंडेशनने सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या करारामुळे उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होऊन गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत देणे आणि प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT