मुंबई

एटीएसकडून मुंबई, ठाण्यात संशयितांची धरपकड

CD

एटीएसकडून मुंबई, ठाण्यात संशयितांची धरपकड

मुंबई, ता. ६ ः दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या घातपाती कृतीचा कट आखल्याच्या गुन्ह्यात मुंबई, ठाण्यातून दोन तरुणांना अटक केल्यानंतर त्यांच्या अन्य साथीदारांची राज्य दहशतवादी पथकाकडून (एटीएस) धरपकड, झाडाझडती सुरू झाली आहे. एटीएसने कांदिवली आणि ठाण्यातून आणखी दोन संशयित तरुणांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यातील एक तरुण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.
एसटीएस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली स्पेशल सेलने अलीकडेच घातपाती कारवाईचा कट आखल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यात सहभागी संशयितांचे शोधसत्र आरंभले. गुन्ह्यात सहभागी दोन आरोपी कुर्ला आणि खडवली येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच दिल्ली स्पेशल सेलचे पथक, केंद्रीय तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी एटीएसच्या मदतीने दोघांना ताब्यात घेत अटक केली. मोहम्मद हम्माद सलाउद्दीन मेहमूदअली सिद्दीकी (वय १८) आणि मोसीब अहमद इफ्तिकार अहमद (३३) अशी त्यांची नावे आहेत. त्यातील सिद्दीकी विद्यार्थी, तर अहमद मॅकेनिक असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवत दोघांना दिल्ली येथे पुढील चौकशी व तपासासाठी नेले. त्यानंतर एटीएसने या गुन्ह्यात सहभागाच्या संशयावरून कांदिवलीतील एका अल्पवयीन तरुणाच्या घरी छापा घालत झाडाझडती घेतली, तर ठाण्यातील यासिर मुस्लिम खान यास दिल्ली स्पेशल सेलसमोर हजर राहण्याची नोटीस बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT