मुंबई

‘जेबीआयएमएस’च्या विद्यार्थ्यांना दिलासा

CD

‘जेबीआयएमएस’च्या विद्यार्थ्यांना दिलासा
परीक्षेला बसण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (जेबीआयएमएस) तीन विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ६) अंतिम सत्राच्या परीक्षांना बसण्याची परवानगी दिली. या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांचे प्रवेश नाकारण्यात आले होते.

‘जेबीआयएमएस’च्या निर्णयाला विशाल गुप्ता आणि गौतम नायर यश गायकवाडने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. रियाझ छागला आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. थोडक्यात युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य आणि निकड लक्षात घेऊन तसेच संस्थेच्या चौथ्या सत्राच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होणार असल्याच्या वस्तुस्थितीचाही विचार करून याचिकाकर्त्यांना चौथ्या सत्राच्या परीक्षांना बसण्याची न्यायालयाने परवानगी दिली. तसे असले तरी, ही परवानगी संबंधित पक्षांचे कायदेशीर अधिकार आणि युक्तिवादावर कोणताही प्रतिकूल परिणाम न करता देण्यात येत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगीही दिली. मात्र, या अंतरिम आदेशाच्या आधारे ते कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हक्क किंवा समन्यायी दावे सांगू शकणार नाहीत, असेदेखील स्पष्ट केले. शिवाय, परीक्षा देण्यासाठी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना त्यांची ओळखपत्रे त्वरित परत करावीत आणि त्यांचे ई-मेल पुन्हा कार्यान्वित करावेत, असे आदेश न्यायालयाने संस्थेला दिले.


बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी आखाती देशांमधील भारतीय कामगारांची मुले या अतिरिक्त जागांच्या श्रेणीअंतर्गत एमएमएस अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश रद्द केल्याचे म्हटले होते. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करणारी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या तपासणीनंतर याचिकाकर्त्यांच्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळली आणि ती बनावट असल्याचे उघड झाले होते. त्या निष्कर्षांच्या आधारे तिन्ही याचिकाकर्त्यांचे प्रवेश तातडीने रद्द करण्यात आले. शिवाय, त्यांच्या नोकरीच्या संधीही रद्द केल्या गेल्या आणि त्यांना त्यांची ओळखपत्रे परत जमा करण्यास सांगण्यात आले, असा दावा संस्थेने न्यायालयात प्रतिवाद करताना केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT