मुंबई

मुंबई महापालिकेच्या १,००० कोटींच्या ४ निविदा रद्द; •विरोधक आक्रमक

CD

१,००० कोटींच्या चार निविदा रद्द
विरोधकांची दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
​मुंबई, ता. ७ : महापालिका प्रशासनाने नुकत्याच रद्द केलेल्या १,००० कोटी रुपयांच्या चार निविदांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षाने निविदा रद्द करून भ्रष्टाचाराला थारा नसल्याचा दावा केला असला तरी निविदा प्रक्रियेतील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी याविषयी महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिले आहे. यात पडवळ यांनी निविदा प्रक्रिया ही एका दिवसात पूर्ण होत नाही. निविदा काढण्यापूर्वी संबंधित खातेप्रमुखांपासून ते अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांपर्यंत सर्व स्तरांवर मंजुरी घेण्यात आली होती. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर ही निविदा प्रक्रियाच चुकीची होती तर ती मंजुरी देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न नगरसेवक सचिन पडवळ यांनी उपस्थित केला आहे.

खर्च पगारातून वसूल करा
प्रशासनाने निविदा रद्द करून स्वतःची पाठ थोपटून घेतली असली तरी ही निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी जो वेळ वाया गेला आणि स्टेशनरीसह प्रशासकीय कामावर जो खर्च झाला त्याची जबाबदारी कोणाची, जर प्रशासनाला खरोखरच पारदर्शक कारभार करायचा असेल तर या संपूर्ण प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. झालेला खर्च त्यांच्या पगारातून वसूल करावा, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT