माटुंगा कारशेडमधील स्लीपर कोचला आग
वेल्डिंगच्या ठिणगीमुळे दुर्घटना; मोठे नुकसान टळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एलएचबी स्लीपर कोचला मंगळवारी दुपारी आग लागली. या दुर्घनेची माहिती मिळताच कारशेड प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत संबंधित कोचच्या वरच्या भागाचे सुमारे ७० टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. मात्र कोचखाली बसवलेली महत्त्वाची अंडरस्लंग यंत्रणा सुरक्षित राहिल्याने मोठे तांत्रिक नुकसान टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले, की कोचच्या सीएसएमटी बाजूच्या शौचालयाजवळ नियमित देखभाल व दुरुस्तीचे वेल्डिंगचे काम सुरू होते. या वेळी उडालेल्या ठिणगीमुळे जवळ ठेवलेल्या ज्वलनशील साहित्याने पेट घेतला. कोच नॉन-एसी प्रकारातील असल्याने आतमध्ये हवा खेळती होती. त्यातच त्या वेळी असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
कोच तत्काळ हलवला
आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कोच तत्काळ कारशेडमधून बाहेर काढून मोकळ्या जागेत हलवण्यात आला. या तत्परतेमुळे आग इतर कोचपर्यंत पसरण्यापासून रोखता आली. तसेच कारशेडमधील इतर कोणत्याही कोचचे किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले नाही.
---
सविस्तर चौकशीचे आदेश
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेच्या सविस्तर चौकशीचे मध्य रेल्वेने आदेश दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियम अधिक कडक करण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.