मुंबई

मुंबई विद्यापीठात आजपासून महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताह

CD

मुंबई विद्यापीठात संयुक्त जयंती सप्ताह
मुंबई, ता. ७ : मुंबई विद्यापीठाच्या वतीने महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यासाठी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत संयुक्त जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानोत्सवाचा आरंभ बुधवारी (ता. ८) सकाळी १० वाजता नवीन ग्रंथालय येथे दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शनाने होणार आहे.
संयुक्त जयंती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ८ एप्रिलला सकाळी १० वाजता नवीन ग्रंथालय येथे दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचे उद्‍घाटन आणि मागील वर्षाच्या अहवालाचे (स्मरणिका) प्रकाशन प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक युगपुरुष’ या विषयावर महात्मा फुले चरित्र साधने समितीचे डॉ. सुधीर गाडे यांचे व्याख्यान आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या पुढील टप्प्यात ९ एप्रिलला मराठी भाषा भवन येथे संत गाडगेबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान आणि एकपात्री प्रयोग होणार आहे. तर दुपारच्या सत्रात ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील बाबासाहेब’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. १० एप्रिलला महाडच्या मुक्ती संग्रामाच्या सामाजिक आशयावर चर्चा होईल. दुपारी ‘शिवराय ते भीमराय’ हा क्रांतिकारी जलसा आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहाचा समारोप १४ एप्रिलला होणार आहे. सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन अशी भव्य संविधान रॅली काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता डॉ. भीमराव भोसले यांचे व्याख्यान आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने अनिवार्यपणे केली जाणार आहे. या सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT