जोड : मालाड (पूर्व) येथील रहेजा हाइट्स परिसरात बिबट्या दिसला... बातमीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाची प्रतिक्रिया...
मालाड (पूर्व) येथील रहेजा हाइट्स परिसरात बिबट्या दिसल्याच्या संदर्भात, वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ही माहिती मिळताच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या एका पथकाला परिस्थितीचा आढावा आणि देखरेख करण्यासाठी त्वरित घटनास्थळी तैनात करण्यात आले. परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात आणि आसपासच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. आमचे जलद प्रतिसाद पथक विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी नियमित गस्त घालत आहे.
स्थानिक रहिवाशांना अंधार असताना एकट्याने बाहेर न पडण्याचा, सामायिक भागांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवण्याचा आणि पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक पोलिस आणि सोसायटी व्यवस्थापनाशी समन्वय राखला जात आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.