बेशिस्त वाहनांवर कारवाई
चार आठवड्यांत ७.९१ कोटी दंड आकारणी
मुंबई, ता. ९ ः वाहतूक पोलिसांनी चार आठवड्यांत सिग्नल मोडणे, नो एन्ट्रीत प्रवेश आणि विरुद्ध मार्गिकेवरून वाहन चालवणे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७४ हजार वाहनांवर ७.९१ कोटींचा दंड आकारला.
वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणानुसार बहुतांश अपघातांना ही तीन नियमभंग कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यांचे नियमन काटेकोरपणे केले जाते. मात्र, काही दिवसांत हे नियमभंग वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने वाहतूक पोलिसांनी १२ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान शहरात विशेष मोहीम हाती घेतली. तसेच वरील तीन नियमभंग करणाऱ्या वाहनांविरोधात धडक कारवाई केली.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत सिग्नल मोडणाऱ्या ४७,४५९, नो एन्ट्रीत प्रवेश करणाऱ्या २२,६५० तर विरुद्ध मार्गिकेवरून वाहने चालवणाऱ्या ३,६९८ वाहनांवर ई-चलान जारी करण्यात आले आहे. रस्ते सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून, वाहतूक नियम पाळा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.