बनावट पारपत्राद्वारे आखातात प्रवास
संशयित ताब्यात; दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचा संशय
मुंबई, ता. ९ : बनावट पारपत्राआधारे वरचेवर आखाती देशांच्या वाऱ्या करणाऱ्या मोहम्मद इस्लाम इस्माईल खान यास बुधवारी कुरार पोलिसांनी ताब्यात घेतले. खान दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवतो, असा संशय निर्माण करणारी गोपनीय माहिती विशेष शाखेस मिळाली होती. त्याआधारे खानकडे सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी मालाड पूर्वेतील पठाणवाडीतील दोन निवासस्थाने आणि कार्यालयावर छापा घालून शोधाशोध केली. त्यात १० मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉपसह १२.४७ लाख रुपये, तीन बनावट पासपोर्ट, आधार-पॅन कार्ड आदी भारतीय कागदपत्रांसह कुवेत देशाचे ड्रायव्हिंग लायसन्स, तेथील सिव्हिल आयडी, कुवेत देशाचे चलन आणि ५०० रुपयांच्या दोन बनावट नोटा आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खान याच्या संशयास्पद हालचालींची नेमकी माहिती विशेष शाखेकडे गोपनीय स्राेताद्वारे उपलब्ध झाली होती. त्यात खानच्या बनावट पासपोर्टचे तपशील, त्याची दुसरी पत्नी एका अनोळखी व्यक्तीच्या कार्यालयात लाखोंचा रोख व्यवहार करतानाच्या छायाचित्रांचा समावेश होता.
आरोपींकडे त्याच्या परदेश वाऱ्या, झाडाझडतीत निवासस्थान, कार्यालयात सापडलेली रोकड, बनावट पारपत्र, बनावट भारतीय नोटांबाबत कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याशिवाय खान याच्या ताब्यातून सापडलेल्या मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेटची झाडाझडती घेऊन त्याचे व्यवहार, साथीदार यांच्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.