मुंबई

मुंबई विमानतळ परिसरात आग

CD

मुंबई विमानतळ परिसरात आग

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : सांताक्रूझ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल १) परिसरातील एका इमारतीला आज सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. तसेच या घटनेमुळे विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या १-बी सर्कलजवळ असलेल्या तळघर अधिक तीन मजली इमारतीला सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी आग लागल्याचे सांगण्यात आले. ही आग इमारतीच्या तळमजल्यापुरती मर्यादित होती. विमानतळ प्रशासनाने ही आग ६ वाजून १० मिनिटांनी लागल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या, स्थानिक पोलिस आणि महापालिकेच्या वॉर्ड स्तरावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी आग ‘लेव्हल-१’ची असल्याचे घोषित करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. ​विमानतळ परिसरात आग लागल्याने प्रवाशांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT