मित्सुबिशीची श्रीराममधील धोरणात्मक गुंतवणूक पूर्ण
मुंबई, ता. १० : मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुपची उपकंपनी असलेल्या ‘एमयूएफजी’ बँकेने भारतातील बिगरबँक वित्तसंस्था असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडमध्ये आपली धोरणात्मक गुंतवणूक यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रेफरेंशियल इश्यूद्वारे एमयूएफजी बँकेला इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिल्यानंतर ही गुंतवणूक पूर्ण झाली. एमयूएफजी बँकेने प्रति शेअर ८४०.९३ रुपये या दराने ४७ कोटी ११ लाख २१ हजार ५५ इक्विटी शेअर्स खरेदी केले असून, एकूण गुंतवणूक अंदाजे ३९ हजार ६१८ कोटी रुपये इतकी आहे. भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व आवश्यक नियामक आणि वैधानिक मान्यता मिळाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. या शेअर्सच्या वाटपानंतर, फुल्ली डायल्यूटेड आधारावर श्रीराम फायनान्समध्ये एमयूएफजी बँकेचा सुमारे २० टक्के इक्विटी हिस्सा असेल. हा व्यवहार भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील आतापर्यंतचा दोन देशांच्या संस्थांमधील सर्वात मोठा गुंतवणूक व्यवहार मानला जातो. या गुंतवणुकीमुळे एमयूएफजीची भारतातील उपस्थिती अधिक मजबूत होणार असून, श्रीराम फायनान्सला एमयूएफजीच्या जागतिक कौशल्य, नेटवर्क आणि क्षमतांचा लाभ घेत आपल्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणाला गती देता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.