मुंबई

अकरावीच्या प्रवेशासाठी आजपासून नोंदणी

CD

अकरावीच्या प्रवेशासाठी आजपासून नोंदणी
भाग-१ भरण्यास होणार सुरुवात

मुंबई, ता. ९ ः राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वाजता अकरावी प्रवेशाच्या संदर्भातील भाग-१ भरण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना यामध्ये दहावीच्या परीक्षेसंदर्भात तसेच त्यांची इतर सविस्तर माहिती भरणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यातील भाग-२ हा दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. मागील वर्षी अकरावी प्रवेश यासंदर्भात झालेली एकूणच अनागोंदी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. यासाठी नुकतेच शालेय शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दिवसभर एक बैठक पार पडली. यामध्ये अनेक बदल करण्यासाठी विभागाने तयारी दर्शवली आहे. या नवीन बदलांसंदर्भात सुधारित आदेशही लवकरच जारी करण्यात येणार आहे. या आदेशामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यभरात राबवत असताना विविध प्रकारच्या कोट्यांसाठी देण्यात येणारी मुदत आणि त्यासोबतच ही प्रवेश प्रक्रिया मुदतीत कशी पार पाडली जाईल, यासंदर्भात खबरदारी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT