मुंबई

मुंबईची नालेसफाई ''चाय-बिस्किटा''वर! सभागृहात पावसाळ्याच्या चिंतेपेक्षा ''मस्का-चस्का''चीच चर्चा

CD

नालेसफाईत ‘मस्का-चस्का’चीच चर्चा

मुंबई, ता. ९ : महापालिकेच्या सभागृहात नालेसफाईच्या कामांवरून गंभीर खडाजंगी सुरू असताना, काही सत्ताधारी नगरसेवकांचे लक्ष मात्र नालेसफाईपेक्षा ‘बिस्किट-सफाई’वरच अधिक असल्याचे दिसून आले. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महापालिका सभागृहात पावसाळ्याच्या नियोजनावर चर्चा अपेक्षित असताना, सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे काही नगरसेवक चक्क ५०-५० आणि ‘मस्का-चस्का’चा आनंद लुटण्यात दंग होते.
सभागृहाचे एक वेगळे पावित्र्य आणि शिस्त असते; मात्र गुरुवारी या शिस्तीला जणू चवीचा तडका लागला होता. एका नगरसेवकाने चक्क डबा भरून बिस्किटे आणली होती. ही माहिती जसजशी पसरली, तसे इतर नगरसेवकांचे डोळेही त्या डब्याकडे वळले. विशेष म्हणजे, काही नगरसेवकांनी तर चक्क व्हॉट्सॲप मेसेज करून ‘मलाही खाऊ पाठवा’ अशी फर्माईश केली. मग काय, एका बाकावरून दुसऱ्या बाकावर बिस्किटांचे पाकीट पोहोचवण्याची जणू ‘रिले रेस’च सभागृहात सुरू झाली.
एकीकडे काही सदस्य मुंबईत पाणी साचणार की नाही, यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. दुसरीकडे काही महिला नगरसेविका आणि पुरुष नगरसेवक लपूनछपून बिस्किटांच्या पुड्याचा निपटारा करत होते. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक या बिस्कीट मोहिमेत आघाडीवर असल्याचे पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
शहराच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना बिस्किटांचा डबा उघडणे, हे नगरसेवकांसाठी गंभीर विषय महत्त्वाचा की चवीचा, असा प्रश्न निर्माण करून गेले. पावसाळ्यात नाले तुंबले तर जनतेचा रोष ओढवेलच; पण आजच्या या ‘मस्का-चस्का’मुळे मात्र सभागृहात मिश्कील चर्चांना उधाण आले आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT