मुंबई

एलटीटी करमाळी ११ जूनपर्यंत धावणार

CD

एलटीटी करमाळी ११ जूनपर्यंत धावणार
मुंबई, ता. ९ : उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीला ११ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक २२११५/२२११६ ही सेवा पूर्ववत वेळापत्रकानुसारच धावणार आहे.
ही गाडी दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्रीनंतर १२.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता करमाळी येथे पोहोचते. परतीच्या प्रवासात गाडी करमाळीतून दुपारी १.५० वाजता सुटून एलटीटी येथे मध्यरात्रीनंतर १२.१० वाजता दाखल होते.दरम्यान, या गाडीचे ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर थांबे कायम ठेवण्यात आले आहेत. गाडीची रचना, वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी आरक्षण आणि इतर सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT