मुंबई

एमएमआरमध्ये ‘इनोव्हेशन सिटी’

CD

एमएमआरमध्ये ‘इनोव्हेशन सिटी’
एमएमआरडीए, टाटा समूह आणि राज्य सरकारची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महाराष्ट्राला तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेचे जागतिक केंद्र म्हणून अधिक बळकट करण्यासाठी एमएमआरडीए, टाटा समूहाच्या सहकार्याने एमएमआर क्षेत्रात इनोव्हेशन सिटी उभारणार आहे. त्याला आकार देतानाच ‘इनोव्हेशन सिटी’ कशी असेल, याचे व्हिजन व धोरणात्मक दिशा, अंमलबजावणीचा रोडमॅप निश्चित करण्यासाठी एमएमआरडीए, टाटा समूह आणि राज्य सरकारची पहिलीच संयुक्त बैठक शुक्रवारी झाली.

मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाचे इनोव्हेशन इकोसिस्टम उभारून महाराष्ट्राला तंत्रज्ञान, संशोधनाच्या आणि रोजगारनिर्मितीत आघाडीवर ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने जागतिक आर्थिक परिषद २०२६मध्ये एमएमआरडीए, टाटा समूह आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात नेक्स्ट जनरेशन इनोव्हेशन सिटी उभारण्याबाबत सामंजस्य करारा करार झाला होता. त्यानुसार प्रस्तावित ‘इनोव्हेशन सिटी’ स्थापित करण्याच्या कामाला गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, बिझनेस डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट अफेयर्सचे अध्यक्ष सुचरिता चौधरी, टाटा सन्सचे ऋतेश मंडोत यांच्यासह एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इनोव्हेशन सिटी उभारण्याबाबत सर्व संबंधित घटकांत योग्य समन्वय साधला गेल्याने हा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत आणि संरचित पद्धतीने पुढे जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाचे इनोव्हेशन इकोसिस्टम उभारण्यास तसेच महाराष्ट्राला तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेचे जागतिक केंद्र म्हणून अधिक बळकट करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या मुद्द्यावर चर्चा
- ‘इनोव्हेशन सिटी कशी असेल, त्याचे व्हिजन व धोरणात्मक दिशा
- अंमलबजावणीचा रोडमॅप
- सिटी उभारण्याबाबत संभाव्य भागीदारी
- प्रकल्प पूर्णत्वासाठी वेळापत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT