युद्धविरामानंतरही धास्ती
हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे सावट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : इराणमधील युद्ध तूर्तास तरी थांबले आहे. अमेरिका, इराण, इस्राईल यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला आहे. मात्र, मध्य पूर्वेतील तणाव कायम असल्याने हॉटेल व्यावसायिक धास्तावले आहेत.
इराण-इस्राईल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बाधित झाल्या होत्या. ज्याचा थेट फटका भारतीय हॉटेल उद्योगाला बसला होता. आता शांततेच्या वातावरणाने हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंद आहे. मात्र, युद्ध पूर्णपणे थांबले नसल्याने हॉटेलचालकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. युद्धामुळे युरोप, मध्य पूर्व, अमेरिकेतून येणारे पर्यटक अचानक थांबले होते. मोठ्या प्रमाणात रूम बुकिंग रद्द झाल्या. युद्धामुळे हॉटेल रेस्टॉरंटच्या खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. काही रेस्टोरंटमध्ये पदार्थांचे भाव वाढवण्यात आले.
------------------------------
सिलिंडरच्या दरात वाढ
१ एप्रिलपासून १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९५ ते २१८ रुपयांची वाढ झाली. मुंबईत आता हा सिलिंडर २,०३१ रुपयांना मिळत आहे, तर दिल्लीत २,०७८.५०, कोलकाता २,२०८ आणि चेन्नईत २,२४६ रुपये झाले आहेत. गेल्या चार महिन्यांत एकूण ५०० रुपयांची वाढ झाली आहे.
------------------------
तेलाच्या किमतीचा परिणाम
बीपीसीएल, आयओसी, एचपीसीएलसारख्या सरकारी तेल कंपन्यांनीही वाढ जाहीर केली. आंतरराष्ट्रीय तेल किमती ५० टक्क्यांनी वाढल्या असून, क्रूड १२० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, लहान उद्योगांवर होत आहे.
==
इराण-अमेरिका, इस्राईल युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांना बसला. आता युद्ध थांबल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे, परंतु दोन-तीन दिवसांनंतर हॉटेलचालकांच्या भवितव्याचा अंदाज येईल.
- विजय शेट्टी, अध्यक्ष आहार
==
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता. पदार्थांचे भाव वाढवले नाहीत, पण व्यावसायिक गॅसचा पुरवठा नियमित होणे गरजेचे आहे.
- श्रीनाथ पैय्याडे, मालक, सदगुरू हॉटेल, चेंबूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.